भाजपच्या नाराज नेत्यांची गडकरींशी जवळीक

मुंबई: भाजपने महाराष्ट्रात २०१४ ला मोठे यश मिळवले होते. आणि देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यांनी हे सरकार ५ वर्ष यशस्वीपणे चालवले देखील परंतु त्यांनी स्वपक्षातील अनेक नेत्यांची नाराजी स्वत:वर ओढवून घेतली. आता भाजपला विरोधी पक्षात बसायचे आहे. त्यात फडणवीसांना आता स्वपक्षातील नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. मात्र हे नाराज नेते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी जवळीक साधून फडणवीसांवर कुरघोडी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचीही मोठी नाराजी फडणवीसांवर आहे. एकूणच भाजप नेत्यांच्या देवेंद्र फडणवीस रडारवर आहेत. या नेत्यांना उमेदवारी नाकारण्याचं खापर देखील फडणवीसांवर फुटले आहे. आता हेच नाराज नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गडकरींच्या जवळ जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

२०१४ ला भाजपचे एकहाती नेतृत्व फडणवीसांकडे होते. आता मात्र नाराज नेत्यांचे नेतृत्व आणि पक्षाची कमान मराठा समाजाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. ते नेतृत्व सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाणार असल्याचं बोलले जात आहे.

दुसरीकडे भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडच राज्याचे नेतृत्व कायम राहण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा