भाजपा नगरसेवकांची मदत पी.एम.फंडास, पुणेकरांची केली फसवणूक..!

हडपसर, दि. ७ मे २०२०: ” पालिका सत्ताधारी करताहेत राजकारण ” , आमदार चेतन तुपे यांची टिका. केंद्राने राज्याला हक्काचे पैसे न देता सापत्न वागणूक दिली व त्यातच भाजपा नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पीएम फंडात देऊन पुणेकरांची फसवणूक केली आहे पुणेकर या नगरसेवकांना माफ करणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, यांनी पालिकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांवर टिका केली व म्हणाले पुणे शहरातील भाजपा नगरसेवकांनी त्यांचं मानधन पीएम केअर फंडाला दिले एकीकडे पुण्याचे आयुक्त सी. एस. आर. फंडातून मदत मिळविण्यासाठी आवाहन करत आहेत अशा परिस्थितीत पुणेकरांच्या कष्टाचे कररूपातलीे पैसे पुणेकरांसाठी न वापरता इतरत्र वापरणे योग्य नाही आम्ही सातत्याने कोरोनाच्या मध्ये राजकारण नको आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना केला पाहिजे व पुणेकरांसाठी अधिक काम करून या संकटातून पुणे शहराची सोडवणूक केली पाहिजे अशी भूमिका मांडत आलो आहोत.

परंतू भाजपाने महाराष्ट्रात मात्र सातत्याने या प्रश्नावर गलिच्छ राजकारण सुरू ठेवले आहे आणि आज पुण्यात तर निंदनीय राजकारणाचा कळस पाहण्यात आला आहे. असे सांगून, तुपे पुढे म्हणाले आम्ही सातत्याने नगरसेवकांच्या निधीतून पुणेकरांसाठी औषधे, मास्क, अन्न, स्वच्छतेची उपकरणे, केमिकल घ्यावीत ही मागणी करत आलोय परंतू याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजपा पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत.

पंतप्रधान निधीला पैसे देण्यापेक्षा हे पैसे पुणेकरांच्या हितासाठी वापरले असते तर जास्त योग्य झाले असते केंद्राला पैसे देऊन आपल्याला ज्या पुणेकरांनी निवडून दिले ज्यांनी पुण्याची सत्ता दिली त्या पुणेकरांशी प्रतारणा केली त्यांच्यावर अन्याय केला आहे. व केंद्र सरकार आपल्याकडून पैसे घेते परंतू केंद्राची वागणूक महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्नपणाची आहे हे उघड उघड दिसून येतं आहे व केंद्र सरकार मदत करताना महाराष्ट्राशी दूजाभाव करत आहे हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकलंय अशा परिस्थितीत हे पैसे आपल्या पुणेकर जनतेसाठी वापरणं हे सत्ताधारी भाजपचं काम होतं, परंतु अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करायची सवय लागल्यामुळे त्यांनी असं कृत्य केलेला आहे याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. असे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा