पूर्व हवेली मध्ये भाजपला खिंडार; या “बड्या” नेत्याचा राजीनामा….!

लोणी काळभोर, दि. १८ ऑगस्ट २०२०: भारतीय जनता पार्टीचे पूर्व हवेलीचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून चित्तरंजन गायकवाड यांची ओळख होती, पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन पूर्व हवेली मध्ये ४५ हजार सभासद नोंदणी करून घेतली होती व राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये सत्कार करण्यात आला होता. त्यांनी गोरगरिबांसाठी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. त्यांचा रावसाहेब दानवे, विनोद तावडे, यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला होता. शिरूर मतदार संघात भाजपची एकहाती सत्ता राखण्यात यशाचा वाटा होता.

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली, या कार्यकारणीमध्ये चित्तरंजन गायकवाड व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांनी पक्षाकडे जिल्हा कार्यकारणी मध्ये काम करण्यासाठी कोणत्याही पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नाही. किंवा कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. तसेच कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता यापूर्वीही चित्तरंजन गायकवाड व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सरपंच गौरी गायकवाड यांनी पक्षाचे प्रामाणिकपणे अहोरात्र काम केले आहे. आणि भविष्यात देखील काम करणार आहेत . परंतु पक्षाकडे वेळोवेळी सुचविले होते की, ज्या पदाधिकाऱ्यांनी किंवा सदस्यांनी मागील काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये व जिल्हा परिषद निवडणूक असो, लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो या सर्व निवडणुकांमध्ये ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे तसेच पदाधिकाऱ्यांनी किंवा सदस्यांनी पक्षविरोधी काम केले त्या मंडळींवर कारवाई करा.

जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतात अशा कार्यकर्त्यांना ताकद द्या. परंतू आज झालेल्या निवडीवरून असे दिसते की, आपण या मंडळींवर कारवाई करण्याऐवजी शाबासकी म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन त्यांची ताकद वाढवली आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे, असे बोलताना चित्तरंजन गायकवाड यांनी पत्रात नमूद केलं आहे.

पक्षाविरोधी काम करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर किंवा सदस्यांबरोबर आम्ही काम करू इच्छित नाही. म्हणून आज पक्षाच्या पदाचा, तसेच भाजप प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देत आहे. असा उल्लेख चित्तरंजन गायकवाड, व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सरपंच गौरी गायकवाड, यांनी पत्राद्वारे कळवले आहे. राजीनामा पत्र पुणे जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांच्याकडे सुपूर्त केलं आहे, असे बोलताना चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा