टेंभूर्णी येथे भाजपा कार्यकारणी पदाधिकारी बैठक संपन्न

5

माढा, दि.११ सप्टेंबर २०२०: टेंभूर्णी (माढा) येथे माढा तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी निवडी संदर्भात इच्छुक पदाधिकारी यांच्या बैठकी साठी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल टेंभुर्णी येथे पार पडला.

पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, भाजपा नेते आप्पासाहेब देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष माळशिरस माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे उपस्थित होते.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले माढा तालुका भाजपाध्यक्ष हे पक्षाला तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून त्यांचे संघटन कौशल्य उत्तम व पक्षवाढीसाठी उपयोगी पडत आहे. यावेळी भारत नाना पाटील,सौ. गीतांजली कुलकर्णी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले संपूर्ण जिल्हा भाजपमय करणार असून पक्षाचे कार्य जो चांगले करील, पक्ष त्याच्या पाठीमागे उभा राहील. म्हणून योगेश बोबडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड ही निश्चित केलेली असून, येथून पुढच्या काळात योगेश बोबडे हेच तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतील असे सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा