पुरंदरमध्ये भाजपच्या वतीने कोविड-१९ योद्धांचा राखी बांधून सन्मान    

पुरंदर, दि.९ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज सासवड येथे कोरोना योद्धांचा राखी बांधून आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस, नगरपालिका कर्मचारी व महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना महिलांनी राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

सासवड पोलीस स्टेशनमध्ये या महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या. याप्रसंगी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस. हाके  व त्यांच्या सर्व सहकारी तसेच नगरपालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण  व ग्रामीण आरोग्य केंद्र अधिकारी डाॅ.किरण राऊत यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तालुका भाजपचे अध्यक्ष राजेंद्र जगताप तालुका कार्याध्यक्ष निलेश जगताप, सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, सरचिटणीस श्रीकांत थिटे, अमोल जगताप, श्रीकांत ताम्हाणे , तालुका पदाधिकारी विजुभैया जगताप ,राजु गायकवाड उपस्थितीत होते.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप म्हणाले की, गेली पाच महिने सर्व शासकीय विभाग कोरोनाचा सामना करीत आहे. पुरंदर तहसील मधील एका कर्मचाऱ्याचा कोरोना मुळे बळी गेला. तहसीलदारांच्या गाडीचा चालक कोरोना पॉजीटीव्ह आला असतानाही न डगमगता काम केले. त्यामुळे आज तालुक्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. या कार्यक्रमाचे नियोजन महिला आघाडीच्या वैशाली धसाडे, ॠतुजाताई जाधव , विजयाताई भोसले आदींनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी – राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा