केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या विरोधात भाजप कोंडीत, ना विरोध ना बचाव…

पुणे, 12 ऑक्टोंबर 2021: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी लखीमपूर हिंसा प्रकरणी विरोधी पक्ष भाजपवर हल्ला करत आहे. आशिष मिश्रा याच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केलीय. विरोधकांबरोबरच भाजपमध्येही आवाज उठू लागले आहेत. अशा स्थितीत भाजप अजय मिश्राबाबत संभ्रमात सापडला आहे, ना तो उघडपणे विरोध करण्यास सक्षम आहे, ना तो केंद्रीय मंत्र्याच्या बचावासाठी समोर येत आहे.

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरच्या टिकुनियामध्ये चार शेतकऱ्यांना कारनं चिरडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जण ठार झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा या प्रकरणात आरोपी आहे, त्याला पोलिसांनी अटक केलीय आणि आता त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागत आहे. 2022 च्या निवडणुकीपूर्वी घडलेल्या घटनेमुळं, विरोधक आक्रमक भूमिका घेत असताना भाजप या प्रकरणात बॅक फुट वर असल्याचं दिसतं.

स्वातंत्र्य देव यांचा भाजप नेत्यांना सल्ला

उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी रविवारी कार्यकर्त्यांना सल्ला देताना सांगितलं की, लोकांचं प्रेम नेता बनवत असतं. आम्ही फॉर्च्युनरने कोणालाही चिरडायला आलो नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की फक्त तुम्ही कसं वागता यानुसार तुम्हाला मतं मिळतील. रविवारी, अल्पसंख्यांक आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना, स्वतंत्र देव सिंह म्हणाले की, आम्ही नेतृत्व करायला आलो आहोत, कुणाला लुटण्यासाठी नाही. फॉर्च्युनरनं कुणाला चिरडायला आलेला नाही. तुम्हाला मतं मिळाली तर ती तुमच्या वर्तनातून मिळतील.

वरुण गांधींनी सरकारविरोधात मोर्चा उघडला

लखीमपूर खेरी प्रकरणाबाबत, भाजप खासदार वरुण गांधी यांनी अगदी सुरुवातीपासूनच आघाडी उघडली आहे आणि सतत त्यांच्या सरकारवर निशाणा साधत आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर वरुणने एक व्हिडिओ शेअर केला आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली. यासोबतच या मुद्यावर योगी सरकारला पत्र लिहिलं होतं. त्याचवेळी वरुण गांधी यांनी रविवारी लखीमपूर हिंसाचारावर योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

वरुण गांधी यांनी ट्वीट केले की, लखीमपूर खेरी हिंसाचाराचे हिंदू विरुद्ध शीख लढ्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप खासदार म्हणाले की, असा प्रयत्न केवळ अनैतिक आणि खोटाच नाही तर ज्या जखमा भरत आल्या आहेत त्या जखमा पुन्हा उकरून काढणं धोकादायक आहे. ते म्हणाले की आपण राजकीय लाभ राष्ट्रीय एकतेच्या वर ठेवू नये.

भाजप नेते सापडले कोंडीत

ज्या प्रकारे भाजपच्या आत आवाज उठू लागला आहे, त्यामुळं पक्ष अजय मिश्रा यांच्या संदर्भात गोंधळात अडकला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर, भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं म्हणणं आहे की, ज्या प्रकारे लखीमपूर प्रकरणाचे व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि हे स्पष्ट दिसत आहे की शेतकऱ्यांना मागून गाडीनं चिरडलं गेलंय, जे आता सामान्य शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेचा असा संदेश शेतकऱ्यांमध्ये गेलाय की जाणून बुजून शेतकऱ्यांवर गाडी चालवण्यात आली.

ते म्हणतात की पूर्वी असं वाटलं होतं की कदाचित वाहनावरील प्रवाशांसोबत काही प्रकारचा हल्ला झाला आहे. यामुळं कार चालकाचं संतुलन बिघडलं आणि अपघात झाला, पण एकापाठोपाठ एक येत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ही कार शांततेनं पुढं जाणाऱ्या शेतकऱ्यांवर मागून चढवण्यात आलीय. अशा परिस्थितीत, या घटनेवर पक्षाकडून स्पष्टीकरण देणं कठीण होत आहे, कारण आम्ही कायदा आणि सुव्यवस्था हा आमचा सर्वात मोठा मुद्दा बनवत होतो. अशा स्थितीत मंत्र्याचा बचाव करणं कठीण होत आहे.

हे स्पष्ट आहे की, भाजपमधील एका वर्गाचाही असा विश्वास आहे की मंत्र्याच्या मुलाच्या वर्चस्वामुळं आणि अजय मिश्राच्या जुन्या इतिहासामुळं भाजपला मोठं नुकसान होत आहे. त्याचवेळी, आशिष मिश्रा चौकशीच्या वेळीही सिद्ध करू शकला नाही की तो घटनेच्या वेळी दंगलीत उपस्थित नव्हता आणि घटनेच्या वेळी त्याच्या स्थानाबद्दल अटकळ सुरू आहे. अशा परिस्थितीत विरोधक ज्या प्रकारे मंत्री अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी करत आहेत, त्यावरून भाजपला बचाव करणं कठीण जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा