गोल पोस्ट राष्ट्रीय भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोना

भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोना

मुंबई, ११ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात आघाडी सरकार नंतर आता कोरोनाने भाजपाकडे वळण घेतल्याचे पहायला मिळत आहे.तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या इतर बड्या नेत्यांनाही कोरोना झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. “मी आणि माझी पत्नी मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे” असे ट्विट त्यांनी आपल्या मध्ये सांगितले आहे.

काल दिवसभरात बऱ्याच दिग्गजांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून माजी मिस इंडीया पासून ते देशाच्या माजी राष्ट्रपतींना काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.आता भाजपाच्या किरीट सोमय्या यांची कोरोना टेस्ट पाॅजिटिव्ह आल्याचे कळले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version