भाजप आमदाराचा मृतदेह दुकानाबाहेर लटकलेला अवस्थेत!

9

१३ जुलै २०२०: भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रॉय.पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील हेमताबाद सीटचे आमदार यांचा १३जुलै रोजी सकाळी मृतदेह दुकानाच्या बाहेर लटकलेला आढळला.हे दुकान ज्या ठिकाणी आहे.ते देबेन्द्र नाथ रॉय यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटरवर,बिंदोल ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आहे.ती ग्रामपंचायत रायगंज पोलिस स्टेशन अंतर्गत येते.एका पोलिस आधिका-याने सुत्रांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रायगंजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला आसून.या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

हा खुनाचा गुन्हा असल्याचे देबेन्द्रचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. ‘इंडिया टुडे’ मनोजना लोईवाल यांच्या अहवालानुसार देबेन्द्रच्या पत्नीने सांगितले की रात्री एक वाजता कोणी तरी त्यांना कॉल करण्यासाठी आला होता त्यानंतर ते बाहेर गेले. कुटूंबातील दुसर्‍या नातेवाईकाचे म्हणणे आहे की देबेन्द्रला प्रथम मारण्यात आले त्यानंतर मृतदेहाला फाशी देण्यात आला.माझे काका रात्री १० वाजेपर्यंत चहाच्या दुकानात होते कारण तेथे काही मुलाची स्वाक्षरी घेण्यासाठी येत होते. त्यानंतर रात्री दहा वाजता ते घरी गेले.मग साधारण १ वाजण्याच्या सुमारास बाईक आली.ती रात्रीची वेळ होती प्रत्येकजण झोपला होता परंतु आमच्या शेजारची एक टेप आहे, ज्यामध्ये आम्ही पाहिले की रात्री १ वाजेच्या सुमारास बाईक आली, नंतर निघून गेले.माझ्या काकूंनी सांगितले की काकांनी सांगितले की आपण कुठेतरी जात आहे आणि लवकरच परत येईल पण तो आला नाही.काकूने त्या माणसाला पाहिले नव्हते, पण आवाज ऐकला होता. मग पहाटे पाच वाजता मी ऐकले की माझे काका मरण पावले आहेत. मला वाटते की जो रात्री कॉल करण्यासाठी आला होता त्याने त्यास जिवे मारले आहे आणि दुकानासमोर मृतदेह टांगला आहे.ते सध्याचे आमदार होते त्यामुळे आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे. अशी माहिती देवेंद्रचा पुतण्यानी दिली.

भाजप काय म्हणतो?

त्याचवेळी भाजप नेत्यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) वर खुनाचा आरोप केला आहे.हेमटाबादचे भाजपचे आमदार असलेले देबेन्द्र नाथ रॉय यांचा संशयित खून झाला आहे, जे आश्चर्यकारक आहे.यावरून ममता सरकारमधील कायदा आणि गुंडाराजचे अपयश दिसून येते.भविष्यात लोक अशा सरकारला माफ करणार नाहीत.आम्ही याचा तीव्र निषेध करतो असे भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

राखीव असलेल्या हेमाताबाद मतदारसंघातील भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रॉय यांचा मृतदेह अशाप्रकारे घराजवळ लटकलेला आढळला.प्रथम त्यांना मारले गेले, नंतर त्यांना फाशी देण्यात आली असे लोक स्पष्टपणे सांगत आहेत.त्यांचा गुन्हा काय होता? २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला?ओम शांती.असे भाजप बंगालनेही ट्विट करुन म्हटले आहे.

पण या भाजप अमदाराच्या संशयित हत्येच्या घटने मुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आसून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा