नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनय कटियार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वृत्तानुसार, एका व्यक्तीने त्यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत कटियार यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. धमकावणाऱ्या व्यक्तीने नंतर त्याचा फोन बंद केला. भाजप नेत्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, कटियारने सांगितले की, हा कॉल आपल्या वैयक्तिक नंबरवर आला आहे. पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, कटियार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री ते त्यांच्या नॉर्थ एवेन्यू फ्लॅटमध्ये असताना कॉल आला. भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार कॉलरने त्यांना धमकावण्याबरोबरच अपशब्द वापरले. कटियार म्हणाले, “कॉलरने मला विचारले की मी विनय कटियार बोलत आहे की नाही, मी हो म्हटल्यावर कॉलरने मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.” कटियार म्हणाले, “तुम्ही स्वत: ला किती काळ वाचवणार, तुमच्याकडे अजून फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि मी तुम्हाला ठार मारीन.” भाजप नेते म्हणाले की, तू कुठून बोलत आहेस हे विचारल्यावर कॉलरने आपला पत्ता जंतर-मंतर असा सांगितला. ते म्हणाले की त्यानंतर धमकावणाऱ्या व्यक्तीने फोन डिस्कनेक्ट केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.