भाजपने पोस्टर वर लावला समाधानी शेतकऱ्याचा फोटो, तोच झाला आंदोलनात सामील

नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२०: नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, भाजपने एक पोस्टर प्रसिद्ध केले होते, असे म्हटले होते की, पंजाबमधील किमान आधारभूत किंमती (एमएसपी) वर शेतकरी खूश आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये सुखी शेतकर्‍याचे छायाचित्रदेखील लावण्यात आले होते, फोटोतल्या व्यक्तीचे नाव हरप्रीत सिंग आहे.

हरप्रीत सिंह, ज्यांचे पोस्टर पंजाब भाजपाने आनंदी शेतकरी म्हणून सादर केले होते, परंतु पोस्टर वरील हा व्यक्ती स्वतः कृषी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी सिंधू बॉर्डरवर धरणे आंदोलनात सामील झाला आहे. सोशल मीडियावर हरप्रीत सिंगच्या पोस्टरसंदर्भात बरीच खळबळ उडाली होती. यानंतर पंजाब भाजपाने आपल्या फेसबुक पेजवरून हे पोस्टर हटवले आहे.

हरप्रीत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, पंजाब भाजपने त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांचे ६-७ वर्ष जुना फोटो वापरला आहे. ते म्हणतात की, माझ्या परवानगीशिवाय भाजपाने माझा फोटो आपल्या पोस्टवर लावला आहे. पण, मी सिंघु सीमेवर उभा आहे आणि नवीन कृषी कायद्यांचा निषेध करत आहे.

हरप्रीतसिंग म्हणाले की, नवीन कृषी कायद्यांबाबत कोणताही शेतकरी खूष नाही. भाजपाप्रणित सरकार कधीही सिंघु सीमेवर आले नाही किंवा शेतकरी या कायद्याविरोधात का आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. शेतकरी नवीन कृषी कायद्यांना पूर्णपणे नकार देत आहेत आणि त्यांचा रोष वाढत आहे.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले हरप्रीत सिंह म्हणाले की, सरकार असे म्हणत आहे की हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, परंतु हे कायदे शेतकऱ्यांसाठी नुकसान कारक आहे हे आम्हाला माहित आहे. सरकार जोपर्यंत हे तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबणार नाही.

हरप्रीतसिंग यांच्या फोटोच्या वापराविषयी पंजाबचे भाजपा प्रमुख अश्वनी शर्मा म्हणाले की, “मलाही या प्रकाराबद्दल आत्ताच समजले आहे या विषयी संपूर्ण माहिती घेतल्यावर मी याबाबत स्पष्टीकरण देईल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा