भाजपचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे निधन

6

नवी दिल्ली २६ जून २०२३: भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची किडनी निकामी झाली होती. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार दुबे हे बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मल्डी ऑर्गन फेल्युअरमुळे ते जतन करता आले नाही. ते आजारी असल्याची माहिती फक्त काही लोकानांच होती. आग्रा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा