मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर भाजपने केला पलटवार

नवी दिल्ली, दि. २२ जून २०२०: भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढविला ते म्हणाले की डॉ. सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना शब्दांची ‘बाजीगरी’ दाखवली असून स्वत: सिंह हे पंतप्रधान असताना त्यांनी चीनला शेकडो किमीची जमीन समर्पित केलेली आहे आणि याची चिंता त्यांना असायला हवी होती, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. चीनने सन २०१० ते २०१३ दरम्यान ६०० पेक्षा अधिक वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) अचानक आक्रमण केले, असेही नड्डा म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांनी तोलून मापून बोलले पाहिजे, असा सल्ला डॉ. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. डॉ. सिंह यांचे वक्तव्य आल्यानंतर काही वेळातच नड्डा यांनी ट्विट केले.

नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वक्तव्य ही शब्दांची ‘बाजीगरी’ आहे. दुर्दैवाने, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आचरण पाहून कोणताही भारतीय त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. आमच्या सशस्त्र सेनेवर ज्याने सतत प्रश्न उपस्थि केले, त्यांचा उत्साह मारण्याचा प्रयत्न केला, तो हाच काँग्रेस पक्ष आहे, हे लक्षात ठेवा.’ .

त्यांनी ट्वीट मध्ये पुढे म्हटले आहे की, “डॉ. सिंह हे त्याच पक्षाचे नेते आहेत ज्या पक्षाने भारताची ४३,००० किमीची जमीन चीनच्या हवाली केली. यूीपीएच्या काळात भारताने कोणतीही लढाई न करता रणनीतिक आणि भौगौलिक समर्पण केले. डॉ. सिंह हे अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त करू शकतात, मात्र पतंप्रधान कार्यालयाच्या जबाबदारीवर नाही. यूपीएच्या काळात त्या कार्यालयाची प्रतिष्ठा घसरली आणि आमच्या सशस्त्र सेनेचा अपमान झाला. मात्र एनडीएने ते बदलले आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा