मुंबई, २९ जुलै २०२०: कोरोना काळात भाजपाची पहिली कार्यकरिणी बैठक पार पडत आहे. ज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुका येण्यासाठी अजूनही ४ वर्षाचा कालावधी आहे आणि जेव्हा होतील त्या नंतर आम्ही राज्याच्या हितासाठी शिवसेनेबरोबर येऊन सरकार स्थापन करु असे व्यक्तव्य त्यांनी केलं. तसेच पुढे त्यांनी नीतीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे एकत्र निवडणुकीचे दाखले दिले. नंतर ते म्हणाले जे पी नड्डा यांनी ज्या प्रकारे स्वबळावर लढण्याचा संकल्प सांगितला तशाच निवडणुका पार पडतील. पण, राज्याच्या हितासाठी शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी आपण तयार आहोत असे देखील ते म्हणाले.


देवेंद्र फडणवीसांची सारवासारव…..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल्यांच्या शिवसेनेच्या विधानावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत, आमच्या कडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही आणि शिवसेनेकडूनही कोणत्याही अशा प्रकारचा आम्हाला प्रस्ताव नाही असे ते म्हणाले. ज्यामध्ये ते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर सारवासारव करताना दिसत होते.
भाजपाची कार्यकारीणीची बैठक जरी पार पडत असली तरी त्याच्या नेत्या यामध्ये काय भूमिका मांडत आहेत, राज्याला कोणती दिशा देत आहेत, याबाबत जनमाणसांत त्यांच्या बद्दल संभ्रमच निर्माण झाल्याचे चित्र सध्या आहे. तर याचा फटका देखील येणाऱ्या काळात भाजपाला बसू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी