महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावीज बिल विरोधी आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

नागपूर, १९ नोव्हेंबर २०२० : नागपूर परिसरातल्या शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव पीक नुकसान, वीज देयकं अशा विषयावरती मोठ्याप्रमाणावर मोर्चे निघतील या भितीनं राज्यातल्या महाविकास आघाडीनं यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते चद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते.

वाढीव विज बिलासंदर्भात दिलासा देण्यासाठी ऊर्जा मंत्र्याना कुठलही अर्थसाहाय्य राज्य शासनाकडून मिळत नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज बिल विरोधी आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे विधान परिषदेसाठीचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून आम्ही मताधिक्य मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा