गोल पोस्ट राष्ट्रीय भाजपने २४ तासात मला आणि माझ्या कुटुंबाला ५०० हून अधिक बलात्काराच्या आणि...

भाजपने २४ तासात मला आणि माझ्या कुटुंबाला ५०० हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या…..

नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२१: आपल्या ट्विटमध्ये तो म्हणाला,”एका भाजपा सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता.गेल्या २४ तासात मला आणि माझ्या कुटुंबाला ५०० हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा”.

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या मधे त्याने हा खुलासा केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने हे सांगितलं आहे.या आरोपामुळे एकच सर्वत्र खळबळ उडाली आणि आता चित्रपट सृष्टी आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरी, श्रेया धन्वंतरी यांनी त्याच्या या ट्विटवर त्याला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. त्याचं हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट केलं आणि अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.तर ट्विट च्या खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टॅग केल्याचे ही दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version