पेण, रायगड ६ नोव्हेंबर २०२३ : पेण तालुक्यातील अकरा ग्राम पंचायतीचा निकाल आज जाहीर झाला असुन या अकरा ग्राम पंचायतींपैकी नऊ ग्राम पंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने भाजपचे नेतृत्व मान्य केले असुन आता ज्या ग्राम पंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे त्या ग्राम पंचायतीमध्ये केंद्रासह राज्यातील विवीध प्रकारच्या योजना तसेच विवीध प्रकारची कामे करून तेथील विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पेण तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुका या आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने लढविण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश प्राप्त झाले असुन भाजपने अकरा पैकी नऊ ग्राम पंचायतीतींवर आपले कमळ फुलवले आहे. यामध्ये तरणखोप ग्राम पंचायत मध्ये दर्शना दिनेश पाटील, बेलवडे ग्राम पंचायती मध्ये हरेश परशुराम पाटील, वरवणे ग्राम पंचायती मध्ये देहू श्रावण वाघमारे, महलमीरा ग्राम पंचायती मध्ये सोनल बाळू उघडा, बळवली ग्राम पंचायती मध्ये उज्वला समाधान पाटील, दिव ग्राम पंचायती मध्ये मनीषा मंगलदास ठाकूर, वडखळ ग्राम पंचायती मध्ये शिवानी विश्वास म्हात्रे, बोरी ग्राम पंचायती मध्ये नंदिनी रवींद्र म्हात्रे, बोरगाव ग्राम पंचायती मध्ये ताई रवींद्र खाकर अशा नऊ ग्राम पंचायतीमध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्नील पाटील