कल्याण डोंबिवलीत सुद्धा भाजपा कार्यकर्त्यांनी केले घंटानाद आंदोलन…

14

डोंबिवली, २९ ऑगस्ट २०२०: राज्यातील मंदिरे सुरू करण्यााठी आज राज्यात अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करायला सूरूवात केली आहे. सकाळी ६ वाजल्यापासूनच हे आंदोलन आज सूरू झाले आहे . अगदी त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीत सुद्धा कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले आहे .

कल्याण डोंबिवलीचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सुद्धा घंटा नाद आंदोलनात सहभागी होत मंदिर उघडण्याची मागणी केली आहे . किती दिवस आता मंदिरे बंद ठेवणार आहात ,आता तरी मंदिरे ,सूरू करा असे ते म्हणाले . त्याच बरोबर अनेक नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी सुद्धा यात सहभाग घेतला होता . त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ भरत जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच्या परिसरात घंटानाद आंदोलन करत सरकारला मंदिर उघडण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे कल्याण-ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावातील भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा घंटानाद आंदोलन केले आहे. मंदिर दर्शनासाठी सूरू करा, अशी मागणी केली जात आहे .

अंतर पाळत आणि मास्कचा वापर करत कल्याण डोंबिवलीत भाजपच्या बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केली आहेत. त्यामुळे या घंटानाद आंदोलनाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचे ठरेल .

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे