मुंबई २६ जून २०२१: ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मुलुंडमधे चक्का जाम करण्यात आहे. आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झालं आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते मंत्रालयाच्या परिसरात जमले आहे. मुंबईबरोबर औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथेही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन आंदोलनाला सुरुवात केली आहे.
मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात आंदोलक गोळा झाले आहेत. सरकारच्या नाकरर्तेपणामुळे हे आंदोलन करावे लागले. या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. असं भाजपचे गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्याचबरोबर केंद्र सरकारवर खापर न फोडता हा प्रश्न आघाडी सरकारने सोडवावं, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाता प्रश्न सुटेपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा आक्रमक आंदोलकांनी दिला आहे. नागपूरमध्ये विरोधी नेते देवेंद्र फडणवीस आणि पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. मात्र यात कोरोनाच्या काळात राजकीय नेते गर्दी करुन पुन्हा एकदा कोरोनाला निमंत्रण देत नाही का? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस