पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन

मुंबई, २७ फेब्रुवरी २०२१: पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आहे. या प्रकरणानंतर भाजपकडून राठोड यांच्यावर कारवाई साठी मागणी करण्यात येत आहे. भाजप सातत्याने राठोड यांच्याकडू राजीनाम्याची मागणी करत आहे. आता यासाठी भाजप आंदोलन देखील करणार आहे. राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आज ठिकठिकाणी भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

भाजपच्या महिला मोर्चातर्फे मुंबईतील आजचे आंदोलनाच होणार आहे. सकाळी १० वाजता या चक्काजामला सुरुवात होईल. हरी ओम नगर, म्हाडा कॉलनी नंतरचा सिग्नल, मुलुंड पूर्व हायवे येथे हे आंदोलन होईल. पूजा चव्हाणच्या मृत्यूची चौकशी करवी तसेच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागण्या भाजपच्या महिला मोर्चाने केल्या आहेत.

भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली हरी ओम नगर, म्हाडा कॉलनी नंतरचा सिग्नल, मुलुंड पूर्व हायवे येथे आज चक्का जाम आंदोलन होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा