सरकारने लिहीला काळा अध्याय, सरकारने आणीबाणी लावली का ? – देवेंद्र फडणवीस

मुंबई ६ जुलै २०२१  : विधानसभेच्या पाय-यांवर भाजपच्या सदस्यांनी प्रतिअधिवेशन भरवले. त्यावेळी त्यांनी स्पीकर वापरला. तालिका अध्यक्षांच्या खुर्चीवर आल्याबरोबर भास्कर जाधव यांनी स्पीकर जप्त करण्याची कारवाई सुरु केली. यावेळी भाजप सदस्यानीं “ठाकरे सरकार हाय हाय, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी” अशा घोषणा दिल्या. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या सांगण्यावरुन माध्यमांवर कारवाई करण्याची मागणी केली. ज्या प्रकारे माध्यमांवर बोलून त्यांची गळचेपी केली जातीय, त्या सरकारच्या विरोधात आम्ही बोलत रहाणार असे, देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. “ठाकरे सरकारने  लोकशाही विरोधात काळा अध्याय लिहीला आहे. पत्रकारांवर दंडुकेशाही करुन त्यांचे कॅमेरे हिसकावून घेतले. हा केवळ अन्याय आहे”. पत्रकारिता आणि विरोधक एकत्र येऊन आता पुन्हा अधिवेशन सुरु करत आहोत. पत्रकार लोकांना आवाहन करुन आता प्रेस रुम मध्ये अधिवेशन सुरु करत आहोत. आता लोकशाहीच्या दोन्ही स्तंभानी एकत्र येऊन हे अधिवेशन सुरु करु, असं आवाहन विरोघी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी भाजप आमदारांकडून माईक काढून घेतला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सुरक्षा अधिकारी तेथे दाखल झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा