INS रणवीरमध्ये स्फोट, तीन जवान शहीद, तपासाचे आदेश

मुंबई, 19 जानेवारी 2022: मुंबईत आयएनएस रणवीर या युद्धनौकेत स्फोट झालाय. मंगळवारी संध्याकाळी उशिरा आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटात भारतीय नौदलाचे तीन जवान शहीद झाले, तर अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटाबाबत माहिती देताना भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होतं आणि लवकरच बेस पोर्टवर परतणार होतं. दरम्यान, आयएनएस रणवीरमध्ये स्फोट झाला आहे.

नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या स्फोटात कोणतीही मोठी हानी झालेली नाही. ते म्हणाले की, आयएनएस रणवीरमध्ये स्फोट कसा झाला याची चौकशी करण्यासाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

INS रणवीर बद्दल

INS रणवीर ही एक युद्धनौका आहे आणि भारतीय नौदलाच्या पाच राजपूत वर्ग डिस्ट्रॉयरपैकी चौथी आहे. ऑक्टोबर 1986 मध्ये ते नौदलात सामील झाले. INS रणवीरमध्ये 30 अधिकारी आणि 310 खलाशी आहेत. हे शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा