कल्याणमध्ये वाहतूक कोंडीत अडकली रक्तपेढीची बस

नवी मुंबई, ३० नोव्हेंबर २०२२ : कल्याण रेल्वेस्टेशनच्या बाहेर वाहतूक कोंडी ही कल्याणकरांच्या पाचवीलाच पूजली आहे. आज सकाळी नऊपासून मुंबई महापालिकेच्या एलटीएमजी रुग्णालय सायनची रक्तपेढीची बस या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहे. आजूबाजूने वेढा घातलेल्या रिक्षांच्या कोंडीतून मार्ग काढत ही बस रेल्वेस्टेशनच्या बाहेर उभी राहिली.

कल्याण रेल्वेस्टेशनच्या बाहेर आज सकाळपासूनच कल्याणकरांसह लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस, मेलने प्रवास करून उतरणाऱ्या प्रवाशांनाही सामना करावा लागतो. रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर कल्याण बसस्थानक, मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावर रिक्षाची भलीमोठी रांग लागलेली आसते.

रिक्षाचालकांच्या बाबतीत अवघड परिस्थितीमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागतो. काही वेळानंतर वादही होतात. थेट दमदाटी केली जाते. वाहतूक पोलिस कल्याण आरटीओ यांचे मात्र याकडे दुर्लश आहे. यामुळे ही चारही बाजूंनी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा