माढा, दि. १ ऑक्टोबर २०२०: कोरोना महामारीमुळे देशांमध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असताना आ. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर अवाढव्य कार्यक्रमांचे आयोजन न करता रक्तदानाचा सामाजिक उपक्रम माढा तालुक्याच्या वतीने सोलंकरवाडी येथे पार पडला.
पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर रक्तपेढीची टीम कार्यरत होती. सोलंकरवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सोलंकरवाडी सरपंच रमेश शेंडगे, उपसरपंच दिगांबर खरात यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी बाबासाहेब शेंडगे, सत्यवान पांढरे, किसन देवकते, राजेंद्र दडस, दत्तात्रय धायगुडे, बाळासाहेब धायगुडे, नवनाथ बिचकुले, गोपाळ माळी, राजाभाऊ भांगीरे, अनंता गलांडे, संपत राऊत, वसंत देवकाते, सोमनाथ शेंडगे, पांडुरंग काळे, महादेव सोलंकर, संजय पांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील