वाघोली येथे संजय सातव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न 

वाघोली, दि. ८ ऑगस्ट २०२०:  आज दि. ८ ऑगस्ट २०२० रोजी पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, वाघोली ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच संजयराव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त आज  वाघोली येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावर्षी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून एका विधायकाने आरोग्यसेवेचे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम राबविला आहे, अशी माहिती वाघोलीचे माजी उपसरपंच तथा माजी पोलीस पाटील रामकृष्ण सातव यांनी ‘न्यूज अनकट’शी बोलताना सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून हे शिबिर आयोजित करण्यात आले.

वाघोलीत इतर विविध समाजसेवेचे उपक्रम व कार्यक्रम ग्रामस्थांच्या मार्फत राबविली जाणार असल्याचे वाघोलीचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा प्रभारी संदीप सातव, पुणे जिल्हा युवा शिवसेनेचे नेते मच्छिंद्र सातव, भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस अनिल सातव, तर वाघोलीच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मालती घोंगावले, उद्योजक गणेश गोगावले, यांनी सांगितले आहे.

कोरोनाजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजासाठी समाजसेवेचे कार्य करायचे हे मनात ठेवून या वर्षी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाघोली येथे प्रसिद्ध नोबेल हॉस्पिटल, व मॅजेस्टिक सिटी, यांच्या संयुक्त विद्यमानाने व जय भैरवनाथ नवरात्र उत्सव मंडळ व ग्रामस्थ वाघोली यांच्या विशेष प्रयत्नातून हे आज भव्य रक्तदान शिबिर शनिवारी आठ ऑगस्ट रोजी संपन्न करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर मॅजेस्टिक सिटी क्लबच्या हॉलमध्ये सकाळी दहा ते चार पर्यंत आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला व एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. समाजसेवेसाठी हातभार लावला तसेच प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेऊन, चार हात दूर अंतर ठेवून स्वतःची काळजी घेऊन रक्तदान केले असे मत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा