रक्तदानाची चळवळ ऊभी राहावी: प्रविण माने

इंदापूर, दि. ५ जून २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोष्टीवर, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर या रोगामुळे चांगलाच परिणाम झाला आहे. अजूनही या संकटातून बाहेर पडण्यासाठी माणूस झुंजत आहे. अगदी राज्यात असणाऱ्या रक्तसाठ्यावरही या गोष्टीचा परिणाम होऊन सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हे असल्याने शासनाच्या वतीने रक्तदान करण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे.

इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथील युवकांनी प्रविण माने युवामंचच्या वतीने मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

दरवर्षी प्रविण माने यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत समाजोपयोगी कार्य हाती घेत जनतेची सेवा करण्याचा त्यांच्या मित्रपरिवाराचा मानस असतो. यंदा राज्यात असणारा रक्ताच्या तुटीचा विचार करत जागोजागी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या या रक्तदान शिबिराचे उदघाटनही प्रविण माने यांच्या शुभहस्ते पार पडले. गोतोंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या निमित्ताने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच लवकरच गोतोंडी गावातील प्रत्येक कुटुंबासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रविण माने यांनी सांगितले. नागरिकांनी पुढे येत, रक्तदान करत राज्यातील रक्ताची तूट भरून काढावी यासाठी रक्तदानाची चळवळ उभी राहावी असे प्रतिपादन माने यांनी केले.

तसेच आज असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज गोतोंडी या ठिकाणी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांना वृक्षारोपण व वृक्ष संधारण याविषयीचे आव्हान माने यांनी उपस्थितांना केले.

या कार्यक्रमात गोतोंडी गावचे सरपंच शोभना कांबळे, आप्पा पाटील, मारुती नलवडे, दिनकर नलवडे, काशिनाथ शेंडे, गुरुनाथ नलवडे, शंकर भोंग, अनिल खराडे, हरिदास खराडे, पोपट नलवडे, जयकुमार नलवडे, शरद नलवडे, वजीर शेख, पोपट मारुती नलवडे, रोहिदास नलवडे, नवनाथ नलवडे, बाळू नलवडे, संतोष भोसले, आण्णा कांबळे, माऊली जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

तर संदीप माने, धनराज नलवडे, माधव नलवडे, राहुल नलवडे, जयकुमार नलवडे आदी मान्यवरांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा