आज रात्री आकाशात दिसणार ‘ब्ल्यू मुन’ ७६ वर्षानंतर दिसणार हे अनोखं दृश्य

नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०२०: यूएसए, कॅनडा, इंग्लंड, न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री हॅलोविन उत्सव साजरा केला जातो. हॅलोविनच्याच रात्री, ७६ वर्षांनंतर, चंद्र त्याच्या खास निळ्या अवतारात आकाशात चमकतो. जेव्हा लोक भूत प्रेतांच्या पोषाखामध्ये हाँटेड हाउस मध्ये पोहचतील, तेव्हा हा चंद्र त्यांचा क्षण अधिक खास बनवणार आहे. चला ब्लू मून आणि हॅलोविन बद्दल जाणून घेऊया.

जगातील अनेक पाश्चात्य देशांमध्ये हॅलोविन साजरा केला जातो. आता हा हळूहळू भारतातील काही भागात साजरा केला जात आहे.असं म्हटलं जात आहे की ३१ ऑक्टोबर रोजी या रात्री चंद्र त्याच्या नवीन अवतारात दिसणार आहे. जगातील खगोलशास्त्रज्ञांना या खगोलीय घटनेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

३१ ऑक्टोबर रोजी रात्री आकाशात ब्ल्यू मून दिसणार असल्याचं नेहरू तारांगण संचालक अरविंद प्रांजपेय यांनी पीटीआयला सांगितलं. अ‍ॅस्ट्रोफिजिकिस्ट म्हणतात की, ३१ ऑक्टोबरच्या रात्री दुर्बिणीच्या सहाय्यानं निळा चंद्र कोणीही पाहू शकतो. ते म्हणाले की खगोलशास्त्रज्ञ या घटनेचा अभ्यास करण्यास उत्सुक आहेत.

१ ऑक्टोबरला पौर्णिमा होती आणि आता ३१ ऑक्टोबरला दुसरी पौर्णिमा पडत असल्याचं अरविंद प्रांजपेय यांनी सांगितले. सहसा चंद्र निळा, पिवळा आणि पांढरा दिसतो पण आज चंद्र वेगळा दिसेल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे फार विशेष मानलं जातं. बर्‍याच खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ही घटना ७६ वर्षांनंतर घडत आहे.

तसे, निळा चंद्र ही एक असामान्य घटना आहे जी प्रत्येक दोन किंवा तीन वर्षांत दिसून येते. परंतु, सन २०२० दिसणारा हा ब्ल्यू मून म्हणजे निळा चंद्र पाहण्यासाठी आपल्याला २०३९ पर्यंत थांबावं लागंल. ‘ब्लू मून’ म्हणजेच ‘निळा चंद्र’ नावाचं हे दुर्मिळ दृश्य लोकांसाठी विशेष असंल. नासाच्या माहितीनुसार, आतापर्यंत पाहण्यात आलेले ब्ल्यू मून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये दिसले आहेत, परंतु आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गोष्टींपेक्षा हा चंद्र भिन्न असंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा