बीएमसी अधिकाऱ्याला मारहाण, ठाकरे गटाच्या अनिल परब यांच्यासह १५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, ४ जणांना अटक

मुंबई २७ जून २०२३: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत २२ जून रोजी बीएमसीने शिवसेनेची ४० वर्षे जुनी शाखा पाडली. उद्धव गटाच्या शिवसेनेची ही शाखा वांद्रेजवळ बांधण्यात आलेली. ४० वर्षे जुन्या शिवसेना शाखेवर बुलडोझर कारवाई आणि तोडफोडीच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या शाखेत हातोडा वापरणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्याला सोमवारी मारहाण करण्यात आली. पोलिस आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यातच ही हाणामारी झाली.

ज्यावेळी ही शाखा तोडली जात होती, त्या वेळी उद्धव ठाकरे गटातील लोकांचा आरोप आहे की, अधिकार्‍यांनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रांवरही हातोडा मारला. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी छायाचित्रे काढण्यासाठी वेळही दिला नाही. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात संताप आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात शिवसैनिकांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय. शिवसेना (उद्धव गट) नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत बीएमसी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

या घटनेची माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, वाकोला पोलिसांनी बीएमसी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यासह १५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटकही केली आहे. सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम अशी त्यांची नावे आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा