नायजेरियातल्या लागोस येथे बोट बुडाल्याने अपघात

काठमांडू, १० ऑक्टोबर २०२२: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अडकलेला नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला मोठा धक्का बसला आहे. काठमांडूच्या जिल्हा न्यायालयाने माजी कर्णधार संदीप लामिछाने याला एक आठवड्याची पोलीस कोठडी सुनावली आहे. बलात्कार प्रकरणी लामिछाने याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

गेल्या गुरुवारी बलात्काराचा आरोप असलेला संदीप लामिछाने हा गुरुवारी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या होत्या.

दरम्यान, काठमांडूमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर लामिछाने गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. लामिछाने यांनी काही तासांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, मी मोठ्या आशेने आणि ताकदीने पुष्टी करतो की मी या ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नेपाळला पोहोचत आहे आणि खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी नेपाळचा नागरिक असल्याचे घोषित करत आहे. मी निर्दोष आहे आणि न्याय व्यवस्थेवर माझा अढळ विश्वास आहे मी तपासाला पूर्ण सहकार्य करेन, असे म्हटले होते.

लहानपणापासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला आदर्श मानणारा संदीप लामिछाने हा गोलंदाज असून तो नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे . तसेच आयपीएल खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा