मध्यप्रदेश, १८ मार्च २०२३: मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. जिल्ह्यातील चंबळ नदीत भाविकांची बोट बुडून १७ जण बुडाले. यातील तिघांचा मृत्यू झाला असून, चार भाविक बेपत्ता असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. बुडालेले सर्व भाविक हे शिवपुरी जिल्ह्यातील आहेत.
शिवपुरी जिल्ह्यातील सिलाईचीन गावात राहणारे कुशवाह समाजाचे १७ भाविक शिवपुरीहून करौली माता मंदिराच्या दर्शनासाठी पायी जात होते. चंबळ नदी ओलांडण्यासाठी त्यांनी बोटेतून प्रवास केला. मुरैना जिल्ह्यातील टेंटारा पोलिस स्टेशन हद्दीतील रायडी-राधेन घाट येथे भाविक चंबळ नदी ओलांडत असताना बोट बुडाली. १७ भाविक बुडाले. यातील ७ जण पोहून काठावर आले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर गोताखोरांनी एका महिलेसह तीन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. अद्याप ७ जण बेपत्ता असून त्यांच्या शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चंबळ नदीत झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाला चंबळ नदीत बचावकार्यला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून बचाव आणि आवश्यक मदतीचं निरीक्षण केलं जात आहे, असे सांगण्यात आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर