बॉब प्रायमन इंटरनॅशनल स्कुलचा आगळा वेगळा परसबाग प्रकल्प, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीं लावल्या भाज्या

पुणे ७ नोव्हेंबर २०२३ : पुण्यातील चांदखेड येथे, बॉब प्रायमन इंटरनॅशनल स्कुल ने परसबागेचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीं मिळुन शाळेच्या परीसरातील जमीन नांगरणी केली. तेथे विद्यार्थ्यांनीं मेथी, भोपळा, भेंडी या सह विविध भाज्यांच्या बियाणांची पेरणी केली.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लहान वयातच मुलांना शेती, बागकाम या गोष्टींची प्रॅक्टिकल माहिती व्हावी यासाठी शाळेच्या व्यवस्थापक आणि शिक्षकांनीं हा उपक्रम हाती घेतला होता. जमिनीला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका प्रमिला कांबळे आणि शिक्षिका शितल चांदेकर यांनीं केली.

या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी, व्यवस्थापकीय संचालक, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

न्युज अनकट प्रतिनीधी : सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा