नागपुरात कारमध्ये सापडले ३ मुलांचे मृतदेह

7

नागपूर १९ जून २०२३: महाराष्ट्रातील नागपुरात एक खळबळजनक घटना समोर आलीय. एका एसयूव्ही गाडीत तीन मुलांचे मृतदेह आढळल्याने येथे खळबळ उडाली. यातील दोन मुले एकाच कुटुंबातील असून सख्खे भाऊ आहेत. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेनंतर मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. तौफिक, आलिया आणि आफरीन अशी तीनही मुलांची नावे आहेत.

आलियाचे वय ६ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी फिरोज चार वर्षांची आणि आफरीन सहा वर्षांची होती. या तिघांचेही मृतदेह रविवारी सायंकाळी एका एसयूव्हीमधून पोलिसांना सापडले. ही तिन्ही मुले शनिवारी दुपारपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येतय. मुले खेळायला गेली असावीत, असे नातेवाइकांना वाटले, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते न परतल्याने नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाइकांनी जवळच्या रस्त्यांवर तीन मुलांचा खूप शोध घेतला, पण मुले सापडली नाहीत. यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुले बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. हे संपूर्ण प्रकरण फारुख नगरचे आहे.

मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तिन्ही मुलांचा शोध सुरू केला असता एका हवालदाराला एसयूव्ही कारमध्ये तिन्ही मुले बेशुद्धावस्थेत आढळली. या मुलांना कारमधून बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली.

पोलिसांच्या पथकाने मुलांची संपूर्ण माहिती गोळा केलीय. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा