नाशिक, २४ जानेवारी २०२४ : काल नाशिकमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळून असून सदर मुलीचा संशयित खून झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
बालविद्या मंदिरच्या बाजूला मीराद्वार लॉन्सच्या पाठीमागे एक मुलगी पडली असल्याचे पोलिसांना तेथील नागरिकांनी कळवले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. मुलीला पाहिले असता सदर मुलगी मयत असल्याचे पोलिसांना कळाले. ती पाठीला सॅक लावून मान टेकवलेल्या अवस्थेत होती आणि तिचा गळा कशाने तरी आवळला असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्या मुलीचा संशयित खून झाला असल्याचे पोलिसांनी प्रथम तपासात सांगितले.
त्या मुलीच्या सॅकमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच नर्सिंग कॉलेजचे काही कागदपत्रे मिळाली. तिची चौकशी केली असता त्या मुलीचे नाव प्रियांका वीरजी वसावे (वय २०) असे आहे. ती मूळची नंदुरबार जिल्ह्यातील जामना या गावातील असून सध्या ती साई केअर नर्सिंग कॉलेज, नाशिक येथे शिक्षण घेत होती. सदर मुलीबाबत पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या अंतर्गत सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश पगारे










































