राज्यात पहिल्यांदाच पत्रकारांच्या हस्ते साखर कारखान्याचे बॉयलर प्रतिपादन

5

शिरूर, ९ ऑक्टोबर २०२०: समाजातील चांगले वाईट वास्तव चित्र टिपून ते समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार व कारखान्याच्या संचालकांनी ठराव करून पत्रकाराच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ केला आहे. यामुळे राज्यातील पत्रकारांचा एक आगळावेगळा सन्मान असल्याचे यावेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोईटे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या २४ गाळप हंगामाचे गव्हाण पुजन उसाची मोळी टाकुन सकाळचे पत्रकार प्रतापराव भोईटे, दैनिक लोकमतचे पत्रकार प्रा. डॉ. दत्ता कारंडे , दै.प्रभातचे योगेश मारणे, दै. पुढारीचे संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या गव्हाण पूजनाचा मान आज पत्रकारांना देण्यात आला, हा राज्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान आहे असे यावेळी भोईटे म्हणाले.

पत्रकार हा समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत असतो. आजचा पत्रकारांचा केलेला हा राज्यातील पहिला सन्मान आहे असे डॉ कारंडे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी पत्रकारांनी कारखान्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आभार मानले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोकराव पवार, उपाध्यक्ष ऍड रंगनाथ थोरात व संचालक मंडळ उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा