बॉलिवूड अभिनेत्यांची यंदाच्या वर्षाची कमाई

मुंबई : ‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाने नुकतीच भारतातल्या १०० श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या १० बॉलिवूड सेलिब्रेटींची कमाई किती आहे. ते पाहू या.

अक्षय कुमार : अक्षयने या वर्षी २९३.३५ कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.

सलमान खान : सलमान या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने गेल्या वर्षभरात २२९.२५ कोटी कमवले आहेत.

अमिताभ बच्चन : शहेनशाह अमिताभ बच्चन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची या वर्षाची कमाई २३९.२५ कोटी इतकी आहे.

शाहरुख खान : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने यावर्षी १२४.३८ कोटी रुपये कमवले आहेत. तो या यादीत सहाव्या स्थानी आहे.

रणवीर सिंग : रणवीर सिंहने यावर्षी ११८.२ कोटी रुपये कमवले असून तो या यादीत सातव्या स्थानी आहे.

आलिया भट : आलीय भट प्रसिद्धीच्या बाबतीत सदरील यादीत आठव्या स्थानी असून तिची कमाई ६० करोड इतकी आहे.

दीपिका पदुकोण : या यादीत दीपिका दहाव्या स्थानी असून तिची वार्षिक कमाई ४८ करोड एवढी आहे.

अजय देवगण : अजयने चित्रपटातून व अनेक जाहीरातीतून या वर्षी ९४ कोटी रुपये कमवले. तो या यादीत बाराव्या स्थानी आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा