बॉलिवूडचे अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांचे मुंबईत निधन

मुंबई, दि.२९ एप्रिल २०२० : बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे मुंबईत नुकतेच निधन झाले. मुंबईतील कोकिलबेन रुग्णालयात वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना हाय ग्रेड निरो इंडोक्राइन ट्युमर असल्याचं समोर आलं होतं. २०१७ मध्ये या आजारावर इरफान उपचार घेण्यासाठी परदेशातही गेले होते. या बाबत त्यांनी माध्यमांनीही यांबाबत माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वीच इरफान खान यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीलाही जाता आले नव्हते. त्यामुळे ते खचले होते. त्यानंतर रुटीन चेकअपसाठी इरफान कोकिलाबेन रुग्णालयात येत असत. मात्र यावेळी रुग्णालयात चेकअपसाठी गेल्यानंतर ते पुन्हा बाहेर आले नाहीत.

इरफान यांनी अनेक राष्ट्रीय चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. “पानसिंग तोमर” या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. अन्ग्रेजी मिडीयम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील अष्टपैलू खेळाडू गमावल्याच्या भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा