‘सुवर्ण मंदिराजवळ बॉम्ब’, पंजाबमध्ये रेड अलर्ट; एका निहंगसह चार अल्पवयीन ताब्यात

अमृतसर, ३ जून २०२३: अमृतसर येथील सुवर्ण मंदिर/ श्री हरमंदिर साहिब जवळ एक दोन नव्हे तर चार बॉम्ब ठेवले आहेत, अशी सूचना पंजाब पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरुन पोलिस कंट्रोलरुमला फोन करून याविषयी माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये रेड अलर्ट देण्यात आला. तसेच पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकांसह मंदिराजवळ शोध घेण्यास सुरुवात केली.

अमृतसर पोलिस कंट्रोलरुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून सचखंड श्री हरमंदिर साहिबच्या जवळ चार बॉम्ब लपून ठेवले आहेत, असे सांगितले. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना बॉम्बचे धमाके रोखण्यासाठी उघड आव्हान दिले. तो म्हणाला की, “बम के धमाकों को अगर रोक सकते हो तो रोक लो” नंतर फोन कट केला.

फोन आल्यानंतर कंट्रोल रूम इंचार्ज ने पोलिस आयुक्त नोनिहाल सिंह यांना तातडीने यांची माहिती दिली. आणि तातडीने हालचाली सुरू केल्या. अमृतसर पोलिस १० बॉम्ब निरोधक पथकांना घेऊन हरमंदिर साहिब येथे पोहोचेल. तसेच पूर्ण पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी एका २० वर्षीय निहंग सहित चार अल्पवयीन मुलांना पहाटे पाचच्या सुमारास ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. असं पोलिस आयुक्त नोनिहाल सिंह यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा