दिल्लीतील शाळेला पाचव्यांदा ई-मेलवरुन बॉम्बची धमकी, शोधमोहीम सुरू

9

नवी दिल्ली, १६ मे २०२३: दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा हा पाचवा ई-मेल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इंडियन स्कूलला दोन तर दुसरे दोन मेल डीपीएस मथूरा रोडवरील एका शाळेला आले होते.

दक्षिण दिल्लीतील अमृता शाळा प्रशासनाला आज सकाळी सातच्या सुमारास पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा मेल मिळाला होता. शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर दिल्ली पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, शाळेच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे. इंडियन स्कूलला दोन मेल आले आहेत. आतापर्यंत मेल पाठवणाऱ्यांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मेल कुठून व कोण करतंय याचा शोध घेतला असता, हे बॉम्बच्या धमकीचे मेल करणारे दोघेही शाळेचे विद्यार्थी असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर