बोंबील फ्राय

रेस्टॉरंट सारखे चटपटीत बोंबील फ्राय घरच्या घरी बनवा व खाण्याचा आनंद घ्या.
साहित्य: १०-१२ बोंबील, १ वाटीभर आलं- लसूण- कोथिंबिरीची पेस्ट, चमचाभर हळद, २ चमचे तिखट, तांदळाचा बारीक रवा २ वाटी, तळण्यासाठी तेल, मीठ.
कृती: सर्वप्रथम बोंबील डोक्याकडून कापून घेऊन उभा चिरून काटय़ाकडून फ्लॅट करून घ्यावा. धुऊन मीठ लावून ठेवावा. नंतर दाबून सर्व पाणी काढून टाकावं. त्याला हळद, तिखट, आलं- लसूण- कोथिंबीर पेस्ट थोडं तेल घालून लावावं. तेल लावल्याने मसाला बोंबिलाला व्यवस्थित लागतो. गॅसवर तवा ठेवून गरम झाल्यावर तेल घालावं व गरम तेलात बोंबील रव्यात घोळवून त्यावर टाकावा. नंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा