पुणे, २३ एप्रिल २०२१: आज जागतिक पुस्तक दिन. दरवर्षी २३ एप्रिलला हा दिन साजरा केला जातो. लोकांमधे वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक व पुस्तकांचा सम्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाचन हा आपल्यातील अनेकांचा आवडता छंद,जो आपण जिवापाड जोपासतो.
असे म्हणतात की पुस्तक हेच खरे मित्र, हे खरंय पुस्तके आपल्या विचारसरणीला आकार देतात. आपल्या मनाला उत्तेजन देतात आणि आपले क्षितीजे विस्तृत करतात. २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही!
वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच.वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो.
अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणा-यांना नक्कीच आणता येईल.खरं तर या गोष्टी आहेतच पण त्या पेक्षा ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक आपल्या मुलांना हि सवय कशी लावतात हे हि गरजेचं आहे.
पुस्तक हा आपला खरा मित्र आहे,आपल्या कुमकुवत विचारांना प्रबळ मजबूत ठेवण्यासाठी नेहमीच मोलाचं योगदान पुस्तक करत आसतो.पुस्तकामुळे आयुष्य हे किती बदलू शकते याचे मोठं उदाहरण म्हणजे विविध क्षेत्रातील अनेक मोठे कृततवान उद्योग पतींचे पुस्तक प्रेम हे वेळोवेळी समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव