सीताराम माने महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन

बारामती, ३० जानेवारी २०२१:  ह.भ.प श्री सीताराम महाराज माने यांच्या जीवनावर आधारित लालासाहेब जाधव लिखित ” चारीधाम ” या पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रणदुल्लाबाद (ता.कोरेगाव, जि.सातारा) येथे करण्यात आले.

चारीधाम या या पुस्तकामध्ये सीताराम महाराज माने यांचे आत्मचरित्र लिहिले असून त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना पर्यायाने कैकाडी समाजातील लोकांना ज्या यातना सोसाव्या लागल्या आहेत, त्यासाठी सीताराम माने महाराज यांनी कशा प्रकारे त्याग केला, आणि स्वतःमध्ये बदल घडवून घेतला, हे या पुस्तकात नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे समाजाातील पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून, दुसऱ्यांना दोष न देता स्वतः मध्ये बदल करून तो बदल समाजापुढे सिद्ध कसे करावे, याचे संपूर्ण वर्णन लेखक लालासाहेब जाधव यांनी त्यांच्या “चारीधाम “या पुस्तकात केलेले आहे. हे पुस्तकं वाचकांना निश्चितच आवडेल आणि समाजातील नविन पिढीतील तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

पुस्तक प्रकाशना वेळी फलटण मतदार संघांचे आमदार दीपक चव्हाण, मोहळ मतदार संघांचे आमदार यशवंत माने यांच्यासह कैकाडी समाज क्षेत्रीय बंधन हटाव कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत माने, आर.जी. जाधव, पोलीस उपअधिक्षक, प्रिन्सिपॉल स्वरुपचंद गायकवाड, अॅड. दीपक शमदिरे, बंडोपंत जाधव, सोमनाथ जाधव, रघुनाथ जाधव इत्यादी, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा