सालेम (तमिळनाडू), दि. २९ जून २०२०: तमिळनाडूमधील सालेम चेक पोस्ट जवळील ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांना माजी खासदार के. अर्जुन यांच्या रागाला सामोरे जावे लागले. वास्तविक, त्यांनी कोविड -१९ लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्याकडून ई-पासची मागणी अधिकाऱ्याने केली होती.
यावेळेस अर्जुन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. याचा प्रतिकार करण्यासाठी अधिकाऱ्याने देखील त्यांना मागे लोटण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्वांचा राग आल्यामुळे नेते अर्जुन यांनी पोलिसांना चक्क लाथ मारण्यास सुरुवात केली.
यावेळी, इतर पोलीस आणि लोकांनी हस्तक्षेप करण्यास सुरवात केली आणि नंतर माजी खासदार त्यांच्या गाडीत बसण्यास गेले. कोविड -१९ च्या साथीमुळे देशभरात सर्वत्र पोलीस कर्मचारी तैनात आहेत. दिवस-रात्र कर्तव्य बजावून देखील नेत्यांच्या अश्या मनमानीला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी