कोलकाता येथील पुस्तक मेळाव्यात २५ कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री; २६ लाख नागरिकांनी दिली मेळाव्याला भेट

कोलकाता, १३ फेब्रुवारी २०२३ : कोलकाता येथे आयोजित केलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात २५.५० कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. याबाबतची माहिती आयोजकांनी दिली. पब्लिशर्स अँड बुकसेलर्स गिल्डचे सरचिटणीस त्रिदिब चटर्जी यांनी सांगितले, की यंदाच्या पुस्तक मेळाव्याला सुमारे २६ लाख लोकांनी भेट दिली. त्यांनी सांगितले, की मेळावा ३१ जानेवारीला सुरू झाला आणि १२ फेब्रुवारीला संपला. १९७६ पासून सुरू असलेल्या या पुस्तक मेळाव्याने पुस्तकांची विक्री आणि भेट देणाऱ्यांच्या संख्येत विक्रम केला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, की गेल्यावर्षी २४ लाख लोक मेळाव्यात आले होते जे उत्साहवर्धक होते. कारण कोरोना विषाणूच्या साथीनंतर लोक घराबाहेर पडले; मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक लोक आले आणि हा आकडा २६ लाखांच्या पुढे गेला.

चटर्जी म्हणाले, की लोकांच्या या उत्साहाने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पुस्तक मेळ्याच्या इतिहासात हा एक विक्रम आहे. महामंडळाचे अध्यक्ष सुधांशू शेखर डे यांनी सांगितले, की मेळ्यातील सर्व दुकानांमध्ये पुस्तकांच्या विक्रीत सहा ते दहा टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली आहे. या जत्रेत एकूण ९५० दुकाने होती, याशिवाय बांगलादेश पॅव्हेलियनमध्ये ७० दुकाने होती. कोविडच्या भीतीवर मात करीत मोठ्या संख्येने लोक पुस्तक मेळाव्याच्या आवारात पोचले आणि पूर्वीसारख्याच उत्साहाने पुस्तकांची खरेदी केल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते. पुस्तक मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी कादंबरीकार सपना चक्रवर्ती आणि लेखक अनिल आचार्य हे जत्रेचे आकर्षण ठरले. कादंबरीकार सपनामय चक्रवर्ती, प्रा.अनिल आचार्य यांना गिल्डतर्फे या दिवशी सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच, पुस्तक मेळाव्याचे समारोप समारंभात गिल्डने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सर्व लेखक आणि प्रकाशन संस्थांचे आभार मानले. पुस्तक मेळावा आयोजित केल्याबद्दल ‘पब्लिशर्स अँड बुकसेलर्स गिल्ड’ने डोला सेन, सुधांशू सेन यांच्यासह सरकारी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. योगायोगाने, ३० जानेवारी रोजी परंपरेचे पालन करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दीपप्रज्वलन करून आणि हातोड्याने घंटा वाजवून पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन केले. यंदा विक्रमी गर्दी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यांची अपेक्षा निराधार नव्हती, हे पुस्तक मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी गिल्डच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यापूर्वी २०२१ च्या पुस्तक मेळ्यात २३ कोटी पुस्तकांची विक्री झाली होती, हा एक विक्रम होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा