हप्ते चूकले म्हणून कर्जदाराला बेदम मारहाण; तीन दिवस ठेवले डांबून

बुलढाणा, २७ ऑक्टोबर २०२२: बुलढाणा जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीकडून कर्जदाराला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे‌. कर्जाचा हप्ता चुकला म्हणून कायदा हातात घेत अमानुष मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरुन तीन दिवस डांबून ठेवत एका कर्जदाराला मारहाण केली. एवढेच नाही तर सिगरेटचे चटके देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधील अशपाक खान वय वर्ष ३२ या युवकाने बोलोरो या चारचाकी वाहनावर कर्ज घेतले होते.

पण व्यवसाय मंदीत आल्यामुळे या युवकांने ते वाहन अकोला येथील एकास रीतसर नोटरी करुन विक्री केली होती. मात्र खरेदीदाराने या कर्ज देणाऱ्या कॅपिटल फायनान्स चे हप्ते न भरल्यामुळे वसुली करणारे लोकांनी अशपाक यास उचलून खामगाव शहरातील एका खोलीत नेउन तब्बल तीन दिवस मारहान करत होते.

त्यामुळे खाजगी फायनान्स करणाऱ्या कंपन्या वसूलीसाठी कोणत्या पातळीवर आल्या आहेत हे सांगायला नको. या प्रकरणी अशपाक खान याच्या फिर्यादीवरुन शेगाव पोलिस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा