कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस लक्षणात्मक कोरोना रूग्णांवर 50% प्रभावी, अभ्यासाचा दावा

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021:कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस कोरोनाच्या लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ५०% प्रभावी आहेत. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

द लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या पीअर-रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले आहे की, कोवॅक्सीन कोविड-19 विरूद्ध प्रभावी आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ती 77.8% पर्यंत प्रभावी आहे. तसेच त्याचा गंभीर परिणाम होत नाही.

एम्समध्ये केला गेला अभ्यास

नवीन अभ्यासानुसार, 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान, हा अभ्यास दिल्लीच्या एम्समधील 2714 आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला, ज्यांना कोरोनाची लक्षणे होती आणि त्यांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात आली. अहवालानुसार, जेव्हा हा अभ्यास केला गेला तेव्हा डेल्टा प्रकाराने भारतात कहर केला होता आणि हा प्रकार 80% कोरोना प्रकरणांमध्ये आढळला होता.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी संयुक्तपणे Covaxin विकसित केले आहे. यामध्ये भारत बायोटेकने या सहकार्यातून SARS-COV-2 स्ट्रेन मिळवला. Covaxin चे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातात. या वर्षी जानेवारीमध्ये, कोवॅक्सिनला भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. WHO ने या महिन्यात आपत्कालीन वापरासाठी Covaxin ला मान्यता दिली आहे.

लस COVID-19 विरुद्ध प्रभावी

यापूर्वी, लॅन्सेटने आपल्या पुनरावलोकन अहवालात दावा केला होता की, लस लक्षणात्मक कोविड-19 विरुद्ध 77.8% प्रभावी ठरली आहे. गंभीर लक्षणात्मक COVID-19 विरूद्ध कोवॅक्सीन 93.4% प्रभावी असल्याचे आढळून आले. लक्षणे नसलेल्या COVID-19 विरूद्ध कोवॅक्सीन 63.6% प्रभावी असल्याचे आढळून आले. हे SARS-CoV-2, B.1.617.2 डेल्टाविरूद्ध 65.2% प्रभावी असल्याचे आढळून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा