ब्रा ब्रेस्ट आणि बूब

स्त्री आणि पुरुष यांच्यातला फरक दाखवणारा अवयव म्हणजे स्तन. जन्मजात बाळाला दूध पाजणे हेच या अवयवाचे महत्वाचे काम. पण स्त्रियांच्या सौंदर्यपूर्तीमध्ये स्तनांचे महत्वाचे कार्य आहे. दिवसांगणिक झाकण्याचा हा अवयव सौदर्यांच्या नावाखाली उघडेपणाने दाखवला जातो. उरोज कशापदधतीने दाखवायचे, हे प्रत्येक स्त्रियांचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण देशात लोकशाही आहे.

मात्र काही पुरुष नव्हे बायकांदेखील सोशल मिडीयावर याचा फायदा घेतात. याचे उत्तम उदाहरण रहायचे असल्यास अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या साठी सोशल मिडियावर आलेल्या कमेंट्स. गोल पोळी कशी लाटावी, याचा व्हिडीओ अपडेट केला. त्याचवेळी लोकांनी तिला केवळ ब्रा न घातल्याने ट्रोल केले. त्यांना तिने सडेतोड उत्तर देत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे स्प्ष्टीकरण देत तिने या विषयाला पूर्णविराम दिला. हे प्रकरण संपते न संपते तोच अभिनेत्री मलायका अरोराला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले. कुत्र्याला फिरवायला नेताना तिने ब्रा घातली नाही. तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हे प्रकरण संपते न संपते तोच आता श्वेता तिवारी हिने या युद्धात उडी घेतली. देव माझ्या ब्राचा साईज बघून घेईल. या वादग्रस्त वाक्यावर श्वेता तिवारीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिने या वाक्यावर माफी मागितली.

पण हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे लोकशाही असूनही स्त्रियांना आजही लोकशाहीच्या राज्यात स्वातंत्र्य नाही. जिथे अभिनेत्री या विळख्यातून सुटत नाही, तिथे सर्वसामांन्य महिलांची काय कथा. किंबहुना याचमुळे आजही बलात्कार, योनशौषण यामुळे स्त्रियां आजही स्वतंत्र असूनही स्वतंत्र नाही. आता गरज आहे स्त्रियांनी स्वतंत्र होण्याची. गरज आहे स्त्रियांनी निर्णय क्षमतेने सक्षम होण्याची. तरच हे जग बदलले असे म्हणता येईल. तरच स्त्रियां स्वतंत्र झाल्या असं म्हणता येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा