ब्रह्मलिन संत तपकिरे महाराज आषाढी पालखी सोहळा कोरोनामुळे रद्द

माढा (सोलापूर), दि. ३० जून २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील मानाचा चिंचगाव टेकडी येथील ब्रह्मलिन संत तपकिरे महाराज आषाढी पालखी सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे महादेव मंदिर सत्संग आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या पालखी सोहळ्याचे यंदाचे १०१ वे वर्ष आहे. श्री तपकिरे महाराजांनी शके १८४१ म्हणजेच इसवी सन १९१९ मध्ये हा पालखी सोहळा सुरू केला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी पुढे या पालखीला मानाचे स्थान असून १७ व्या क्रमांकावर ही दिंडी असते. परंतू यावर्षी कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी शासन आदेशान्वये या मानाचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

ब्रह्मलिन संत तपकिरे महाराज मठ पंढरपुर येथे कोणत्याही साधकाने जाण्याचा प्रयत्न करु नये. कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या साधकाची राहील. तसेच दरवर्षी होणारा गुरुपौर्णिमा उत्सव ही यावर्षी रद्द करण्यात आला आहे.तरी गुरुपौर्णिमेदिवशी कोणत्याही साधकाने दर्शनासाठी म्हणून महादेव मंदिर सत्संग आश्रम चिंचगाव टेकडी येथे येऊ नये असे आवाहन महादेव मंदिर सत्संग आश्रम चिंचगाव टेकडी चे अध्यक्ष प.रामानंद सरस्वती महाराजांच्यावतीने करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा