ब्रिटन: मानवाच्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. हे सत्य आजवर कोणालाही नाकारता आले नाही. परंतु जर तुम्हाला असे कुणी सांगितले की मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येऊ शकते तर तुमचा विश्वास बसणार नाही. होय पण हे आता शक्य होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. वैद्यक शास्त्राने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहेत. आता वैद्यक शास्त्रात नवी क्रांती होणार आहे. सध्या हृदय, किडणी, यकृत यांसह विविध अवयवांचे प्रत्यारोपण प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. आता त्यापुढील टप्पा गाठण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीचे शीर दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपीत करण्याचे तंत्रज्ञान येत्या १० वर्षांत प्रत्यक्षात येईल, असा दावा ब्रिटनचे माजी न्यूरोसर्जन आणि रोबोटिक्स तज्ज्ञ डॉ.ब्रूस मॅथ्यू यांनी केला आहे. ‘डेली मेल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मॅथ्यू ब्रिटनच्या हल विद्यापीठाच्या प्रशिक्षण रुग्णालयाचे माजी चिकित्सा प्रमुख आहेत. मस्तिष्क प्रत्यारोपणावेळी मेंदू आणि स्पाइनल कॉर्ड यांचा योग्य समन्वय साधता आला तर आपल्याला हा टप्पा सहज गाठता येईल, असे मॅथ्यू यांनी सांगितले. हे शक्य झाले तर दिव्यांग किंवा हात- पाय निकामी झालेल्या व्यक्तींना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. तसेच अधिक प्रगत तंत्रज्ञानामुळे मृतांना पुन्हा जीवदान देणे शक्य असल्याचे मॅथ्यू म्हणाले. वैद्यक शास्त्रात विविध अवयवांच्या प्रत्यारोपणाप्रमाणे मस्तिष्क प्रत्यारोपणाबाबत संशोधन सुरू आहे. त्यामुळे येत्या १० वर्षात यात खूप प्रगती होणार आहे. तसेच अत्यंत किचकट वाटणारे हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात येणार आहे.
रोबोटिक्स, स्टेम सेल प्रत्यारोपण आणि नर्व्ह सर्जरीत आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मस्तिष्क प्रत्यारोपणाचा टप्पा आपण गाठू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, अमेरिका आणि युरोपमध्ये नैतिक कारणांमुळे या संशोधनाला पाठिंबा मिळत नाही. चीनमध्ये याबाबतच्या संशोधनला परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या जिआओपिंग रेन या संशोधकाने २०१७ मध्ये यशस्वी मस्तिष्क प्रत्यारोपण केल्याचा दावा केला होता. एका मृत व्यक्तीचे शीर दुसऱ्या मृत व्यक्तीवर यशस्वीपणे प्रत्यारोपित केल्याचे त्यांनी म्हटले होते. चीनच्या हार्बिन वैद्यकीय विद्यापीठात करण्यात आलेल्या या सर्जरीला १८ तास लागले होते. सर्जरीनंतर स्पाइन, नर्व्ह आणि रक्त वाहिन्या जोडण्यात आल्या होत्या. रशियातील संगणक संशोधक वैलरी स्पिरिदोनोव यांनी २ वर्षापूर्वी स्वतःच्या मस्तिष्क रोपणासाठी स्वच्छेने परवानगी दिली आहे. त्या मासंपेशीच्या असाध्य आजाराचा मुकाबला करत आहेत.
: मानवाच्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. हे सत्य आजवर कोणालाही नाकारता आले नाही. परंतु जर तुम्हाला असे कुणी सांगितले की मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येऊ शकते तर तुमचा विश्वास बसणार नाही. होय पण हे आता शक्य होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. वैद्यक शास्त्राने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहेत. आता वैद्यक शास्त्रात नवी क्रांती होणार आहे. सध्या हृदय, किडणी, यकृत यांसह विविध अवयवांचे प्रत्यारोपण प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. आता त्यापुढील टप्पा गाठण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीचे शीर दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपीत करण्याचे तंत्रज्ञान येत्या १० वर्षांत प्रत्यक्षात येईल, असा दावा ब्रिटनचे माजी न्यूरोसर्जन आणि रोबोटिक्स तज्ज्ञ डॉ.ब्रूस मॅथ्यू यांनी केला आहे. ‘डेली मेल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.