मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत उद्या म्हणजे बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या तडकाफडकी शपथविधीनंतर ते आपलं बहुमत सिद्ध करू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. मात्र या सगळ्यात सर्वात मोठी घडामोड होताना दिसत आहे. अजित पवार यांनी आपला राजीनामा दिला असल्याची बातमी हाती आली आहे.
राष्ट्रवादीकडून अजित पवारांना समजावण्याचा प्रयत्न केला जात होता. यात त्यांना यश आले आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे. जर अजित पवार हे सरकार चालवण्यासाठी बहुमत देण्यासाठी असमर्थ ठरत असतील तर त्यामुळे हा राजीनामा दिला असावा. ३.३० देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. त्यातून सर्व चित्र स्पष्ट होईल. सरकार स्थापनेत पुन्हा एकदा वेगळे वळण आले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात जे वेगवेगळे प्रयोग केले गेले ते या आधी कधीही बघितले गेले नव्हते. भाजप उद्या बहुमत देऊ शकाल का हा मोठा प्रश्न आहे; परंतु ज्या प्रमाणे संजय राऊत यांनी विधान केले होते की, ३० मिनिटांत बहुमत सादर करू हे खरं ठरते का हे समजेलच. भाजपकडून सत्ता स्थापन करण्यात घाई झाली हे एकंदरीत समोर येत आहे.