ब्रिटन निवडणुकीत सुद्धा कश्मीर मुद्याचा प्रभाव

23

ब्रिटन: ज्याप्रमाणे कश्मीर मुक्ता भारताच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरला तोच आता ब्रिटनमधील निवडणुकांमध्येही एक महत्त्वाचा विषय ठरला आहे. ब्रिटन मध्ये असलेल्या भारतीयांचा कल आपल्या पक्षाकडे कसा राहील यावरून ब्रिटनमध्येही कश्मीर मुद्द्याचा वापर करण्यात आला.
निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पार्टी मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कंझर्व्हेटिव्ह पार्टी ६५० पैकी ३३७ जागा जिंकत आहे, तर लेबर पक्षाची २०० जागा कमी झाली आहेत. या निवडणुकीत होरो पूर्व मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे बॉब ब्लॅकमॅन म्हणाले की, काश्मीर प्रकरणाने निवडणुकीत मोठी भूमिका बजावली. यामुळे भारतीयांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान केले. काश्मीर समस्येमुळे आम्ही कमीतकमी १० जागा जिंकल्या आहेत.
ब्रिटनमधील ६५० जागांच्या संसदेत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३२६ जागांचा आकडा पार केला आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या खात्यात ३६३ जागा असू शकतात. त्याच वेळी विरोधी लेबर पक्षाने आपल्या पारंपरिक जागा बर्‍याच गमावल्या आहेत. पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले आहेत की आता त्यांना एक नवीन जनादेश मिळाला आहे ज्यापासून ते ब्रिटनला युरोपियन युनियनपासून वेगळे करणार्‍या ब्रेक्सिटची अंमलबजावणी करण्यास सक्षम असतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा