लंडन, ७ सप्टेंबर २०२२: भारतीय वंशाच्या बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन यांची मंगळवारी ब्रिटनच्या गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. ४२ वर्षीय सुएला यांनी यापूर्वी यूके सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. याआधी त्या बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अॅटर्नी जनरल म्हणून काम करत होत्या. आता लिझ ट्रस यांनीही त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत आपल्या सरकारच्या सर्वोच्च संघात त्यांचा समावेश केलाय.
ब्रेव्हरमन दोन मुलांची आई आहे. त्यांची आई हिंदू तमिळ असून मूळची गोव्याची आहे. त्यांची आई मॉरिशसमधून यूकेला गेल्या, तर त्यांचे वडील १९६० च्या दशकात केनियामधून स्थलांतरित झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. यानंतर त्यांनी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याऐवजी ट्रस यांना पाठिंबा दिला.
केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी
सुएला ब्रेव्हरमन यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. २०१८ मध्ये त्यांनी रॉयल ब्रेव्हरमन यांच्याशी लग्न केले. त्या बौद्ध धर्माच्या आहेत आणि नियमितपणे लंडन बुद्धिस्ट सेंटरला भेट देतात. भगवान बुद्धांच्या म्हणींच्या धम्मपदावर त्यांनी संसदेत मंत्रिपदाची शपथ घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे